घरमहाराष्ट्रभाजपा म्हणते, साधू-संतांना बदनाम करणे काँग्रेसची स्क्रिप्ट; धीरेंद्र महाराज प्रकरणाला राजकीय रंग

भाजपा म्हणते, साधू-संतांना बदनाम करणे काँग्रेसची स्क्रिप्ट; धीरेंद्र महाराज प्रकरणाला राजकीय रंग

Subscribe

Ram Kadam On Shyam Manav | आता या प्रकरणात राजकीय रंग येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा नेते राम कदम यांनी अंनिसचे अध्यक्ष शाम मानव यांच्यावर काँग्रेसचा अजेंडा राबवत असल्याची टीका केली आहे.

Ram Kadam On Shyam Manav | मुंबई – बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र महाराज यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी खुले आव्हान दिले आहे. चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 30 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जा, असं थेट आव्हान बागेश्वर बाबांना देण्यात आलं होतं. मात्र, आता या प्रकरणात राजकीय रंग येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा नेते राम कदम यांनी अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांच्यावर काँग्रेसचा अजेंडा राबवत असल्याची टीका केली आहे.

हेही वाचा -अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करा; अंनिसचे ‘त्या’ ईशान्येश्वर संस्थानला आवाहन

- Advertisement -

आम्ही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही. हिंदू धर्माचे ४ वेद, १८ पुराण, ६ दर्शन शास्त्र, उपनिषद, २ महाकाव्य आणि विधिविधान हेच मुळात खोल विज्ञान आहे. अध्यात्मिक साधनेच्या बळामुळे आणि अष्टांग योगातून प्राप्त होणार्‍या परम दिव्य दृष्टीचा अनुभव या गोष्टी काँग्रेससारख्या तुमच्या लोकांना पचणार नाहीत. कधीतरी काँग्रेसकडून स्क्रिप्ट घेतल्याशिवायही बोलत जा, असं भाजपा नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.


राम कदम यांनी श्याम मानव आणि राहुल गांधी यांचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आले असता श्याम मानव यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा हा फोटो असून धीरेंद्र महाराज यांना विरोध म्हणजे काँग्रेसची स्क्रिप्ट आहे. हिंदू संत आणि साधूंची बदनामी करण्याचे हे षड्यंत्र असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -