घरताज्या घडामोडीसफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्यासाठी भाजपचे उपोषण

सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्यासाठी भाजपचे उपोषण

Subscribe

मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा खात्यात काम करणारे २६ हजार ६१८ कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मालकी हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत. त्यांना पालिकेच्या वसाहतीमध्ये, चाळीत भाड्याने राहावे लागत आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात काम करणाऱ्या २७ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा लोखंडे, भाजपचे मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले यांच्या पुढाकाराने भाजपतर्फे चिंचपोकळी, लक्ष्मीनारायण मंदिर येथे सोमवारी सकाळी ‘एक दिवसीय लाक्षणिक उपोषण’ करण्यात येणार आहे. (BJP will go on a symbolic hunger strike to provide owner occupied houses to the sanitation workers)

मुंबईला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा खात्यात काम करणारे २६ हजार ६१८ कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मालकी हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत. त्यांना पालिकेच्या वसाहतीमध्ये, चाळीत भाड्याने राहावे लागत आहे. सेवा निवृत्त झाल्यावर त्यांना पालिकेच्या वसाहतीमधील घरे त्वरित खाली करून द्यावी लागतात. त्यामुळे पुढे त्यांच्या मुलांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागते. सध्याच्या काळात भाड्याच्या घरात राहणे परवडत नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला हानिकारक कचरा उचलून मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी हे दिवस – रात्र राबत असतात. त्यांना चांगल्या आरोग्य सुविधांसोबतच मालकी हक्काचे घर राहायला मिळायलाच हवे, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या २६,६१८ सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळण्याबाबत व त्यांच्या न्याय हक्कासाठी भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा लोखंडे, भाजप मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले यांच्या पुढाकाराने चिंचपोकळी (प.), आर्थररोड नाका, उत्सव हॉटेल जवळ, साने गुरुजी मार्ग येथील आर्थररोड नाका, उत्सव हॉटेल जवळ, साने गुरुजी मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर येथे सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास “एक दिवसीय लाक्षणिक उपोषण” करण्यात येणार आहे.


हेही वाचा – उद्या नागपूरला बॉम्ब फोडणार; संजय राऊत यांचा शिंदेगटाला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -