Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात दररोज ७० महिला बेपत्ता, सुप्रिया सुळेंच्या आरोपांना भाजप महिला नेत्यांनी दिले...

महाराष्ट्रात दररोज ७० महिला बेपत्ता, सुप्रिया सुळेंच्या आरोपांना भाजप महिला नेत्यांनी दिले ‘असे’ उत्तर

Subscribe

राज्यासह देशातील महिला आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. द केरला फाईल्स या चित्रपटाने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई – महाराष्ट्रात आणि देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्रात १८ ते २५ वयोगटातील दररोज ७० तरुणी बेपत्ता होत आहेत. यावरुन विरोधी पक्षांनी शिंदे – फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या गृह विभागाचे हे अपयश असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule) यांनी केला आहे. (Government’s failure to safeguard its citizens)

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हा राज्यात दरवर्षी ६४ हजार महिला आणि मुली बेपत्ता होत असतात, असे सांगत महाविकास आघाडीच्या काळातील बेपत्ता मुली आणि महिलांची आकडेवारी दिली आहे. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांना विषय समजून घेण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

‘द केरला फाईल्स’ (The Kerala Files) चित्रपटाच्या निमित्ताने महिला आणि मुली बेपत्ता होण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातही मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे, यावर लवकर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

बेपत्ता मुली-महिलांबद्दल शासन स्तरावर काय होत आहे? – सुप्रिया सुळे
‘मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का?’ असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे.

- Advertisement -

‘महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महिला आणि मुली बेपत्ता होणे, हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार सुळेंनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळेंच्या ट्विटनंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्यात महिला-मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी सादर केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातही महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण असेच होते, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचा शोध घेतला जात असल्याचेही वाघ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ…
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या नेत्या सुप्रिया सुळे ताई….

महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य
मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे पण आपण अशा थाटात हा विषय मांडला जणू सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या असो,
आधी विषय समजून घ्या..
महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात.

अगदी महाविकास आघाडीचे सरकार पाहिले तरी
2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या..
2021 मध्ये 3937 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या. (कोविडचे वर्ष)

आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात सरासरी 90 टक्के प्रकरणात डिटेक्शन होते, तर महिलांच्या बाबतीत 75 टक्के डिटेक्शन होते

पश्चिम बंगाल बिहार दिल्लीत हे प्रमाण मुलींच्या बाबतीत वर्षाला सरासरी 12 हजारावर तर महिलांच्या बाबतीत 64 हजारावर आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एफआयआर दाखल केला जातो. निश्चितच ही समस्या गंभीर आहे. राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून प्रत्येक महिला नेत्यांनी एकत्र येत यावर उपाय सूचविले पाहिजेत केवळ टीकेसाठी टीका करुन प्रश्न सुटत नसतात…

एकाच महिन्यात ‘एवढा’ वाढला आकडा
मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून आणि घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा : धक्कादायक! राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ, दररोज 70 मुली बेपत्ता

- Advertisment -