घरमहाराष्ट्रभावबंदकीच्या वादातून भावानेच विहिरीत विष टाकले

भावबंदकीच्या वादातून भावानेच विहिरीत विष टाकले

Subscribe

भावबंदकीच्या वादातून एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या भावानेच विहिरीत विष टाकल्याचे उघड झाले आहे.

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. बऱ्याच ठिकाणी विशेषत: काही गावांमध्ये आतापासून टॅंकरने पाण्याचा पुरवठा करणे सुरु झाले आहे. परंतु, या वस्तूस्थिचे गांभीर्य अजूनही काही लोकांना झालेली नाही. पाणी कितपत मौल्यवान आहे, याची जाणीव त्यांना अद्यापही झालेली नाही. म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत असणाऱ्या पाण्यामध्ये विष टाकण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे विहिरीच्या पाण्यामध्ये विष टाकणारा दुसरा कुणी बाहेरचा व्यक्ती नसून शेतकऱ्याचाच सख्खा चुलत भाऊच असल्याचे समोर आले आहे. सुदैवान पाणी वापरण्याआधी शेतकऱ्याला या गोष्टीची माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा – भांडुप विषबाधा प्रकरण; पाण्यातील ‘ई कोलाय’मुळे विषबाधा

- Advertisement -

काय आहे नेमका प्रकार?

हा प्रकार सूलतानपूर गावाचे शेतकरी गजानन मारोती राजगुरु यांच्या भानापुर शिवारात घडला आहे. गजानन आणि त्यांचे कुटुंबीय या विहिरीचे पाणी पितात. त्यांचे भावबंदकीमध्ये काही वाद झाले होते. या वादानंतर त्यांच्या सख्या चुलत भावानेच विहिरीत विषारी द्राव्य टाकल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विषारी द्राव्य पाण्यात मिसळल्याने विहिरीच्या पाण्याचा रंग लालसर झाला असून त्या पाण्याचा उग्र वासही येत आहे.

हेही वाचा – विषबाधा झाल्यास करा हे उपाय

- Advertisement -

पोलिसांत तक्रार दाखल

याप्रकरणी गजानन राजगुरु यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गजानन यांच्या तक्रारीनुसार त्यांचा सख्खा चुलत भाऊ राजकुमार संजाबराव राजगुरु याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०/ १८, २८४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.


हेही वाचा – घाटकोपरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -