घरताज्या घडामोडीपुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, पोलिसांकडून संशयिताला अटक

पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, पोलिसांकडून संशयिताला अटक

Subscribe

पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-दोन यांनी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करत एका इसमाच्या ताब्यातून ४० लाख ते ३३ हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहीर शेख हा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ त्याच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार अमली विरोधी पथकाने सदर ठिकाणी जाऊन खातरजमा करत, शाहिद शेख यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ३३६.१ ग्रॅम वजनाचे ४० लाख ३३ हजार २०० रुपये किमतीची ब्राऊन शुगर आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख १६०० रुपये असा ४० लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान आरोपी शाहीर शेख याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई करीता आरोपीस कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये १२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह दोघांना अटक

- Advertisement -

मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांनी NABसोबत काम करणार्‍या दोन कथित ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ किलो ब्राऊन शुगर देखील जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन शुगरची किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


हेही वाचा : खासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -