घरपालघरमुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रक्सचा थरार

मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रक्सचा थरार

Subscribe

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील मेंढवण खिंड येथे कंटेनर आणि ट्रकचा सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला.या अपघातात मुंबई लेनवरील कंटेनर दुभाजक तोडून गुजरात लेनवरील टेम्पोला जाऊन धडकल्याने आग लागून दोन्ही वाहने जळून खाक झाली असून कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

– सचिन पाटील

वाणगाव : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील मेंढवण खिंड येथे कंटेनर आणि ट्रकचा सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला.या अपघातात मुंबई लेनवरील कंटेनर दुभाजक तोडून गुजरात लेनवरील टेम्पोला जाऊन धडकल्याने आग लागून दोन्ही वाहने जळून खाक झाली असून कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघाताने आग लागून एक लेन बंद पडल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.तारापूर एमआयडीसी आणि पालघर नगरपरिषद अग्निशमन दलाने दोन तासात आग आटोक्यात आणून जळालेल्या वाहनांचा सांगाडा बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

- Advertisement -

रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाडा खडकोना गावच्या हद्दीतील मेंढवण खिंडीतील तीव्र वळणावर मुंबई लेनवरील कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजक तोडून गुजरात लेनवरून मक्याचे पीठ घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर आदळला.या अपघातात टेम्पोच्या डिझेल टाकीने पेट घेऊन दोन्ही वाहनांना भीषण आग लागून ती जळून खाक झाली.अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तारापूर एमआयडीसी आणि पालघर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या दोन बंबानी दोन तासात वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली.

सकाळच्या सुमारास हायवेवर वाहनांना लागलेल्या आगीमुळे सावधानतेचा उपाय म्हणून पोलिसांनी काही वेळ दोन्ही लेनवरील वाहतूक संपूर्णपणे बंद केली होती.यामुळे वाहनांच्या दोन ते तीन किमीपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या.त्यानंतर आगीचा लोळ थोडा कमी झाल्यानंतर मुंबई लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक हळूहळू सुरू करण्यात येऊन वाहतूक सुरळीत केली गेली.

- Advertisement -

खड्ड्यांमुळे हायवेची वाताहात

मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदर फाउंटन हॉटेल ते गुजरात सीमेवरील अच्छाड पर्यंत जीवघेणे खड्डे पडल्याने हायवेची अक्षरक्ष वाताहात झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीने हायवेची नियमित देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ होऊन नागरिकांचे बळी जात आहेत तर अनेक जण गंभीर जखमी होत असून मागील तीन महिन्यांतच या हायवेवर २०० पेक्षा अधिक अपघातांची नोंद झाली आहे.


हेही वाचा – ‘…तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे’; संजय गायकवाडांची ठाकरेंच्या आमदारांना धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -