Auragabad-Jalana Accident : औरंगाबाद-जालना मार्गावर बस आणि जीपचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

औरंगाबाद-जालना (Auragabad-Jalana Accident) मार्गावर बस आणि जीपचा (Bus And Jeep) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कळमनुरी-पुणे बस (Kalamanuri-Pune bus) आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर हा भीषण (Accident) अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, जीपच्या पुढील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. बसच्या धडकेमुळे जीप रस्ता दुभाजकावर आडवी झाली. यामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर जीपला बसने जोरदार धडक दिल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. मात्र, या अपघातामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये.

जालना रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प

या अपघाताची माहिती मिळल्यानंतर करमाड पोलिसांनी(Karmad Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी बचावकार्यास सुरूवात केली. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे (Auragabad) रवाना करण्यात आले आहे. या अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात आली होती.

जखमींना बाहेर काढण्याचे काम तात्काळ सुरू

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहनातील जखमींना बाहेर काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. अपघातावेळी जागीच चार जणांचा मृत्यू झाल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. या अपघाताचा पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल, हसन मुश्रीफांची माहिती