घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआंदोलनामुळे बससेवा विस्कळीत; विविध मार्गावरील तब्बल 150 फेऱ्या रद्द

आंदोलनामुळे बससेवा विस्कळीत; विविध मार्गावरील तब्बल 150 फेऱ्या रद्द

Subscribe

मुख्यत्वे पुणे, औरंगाबाद, अहमदनगर मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्याने हजारो प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले

नाशिक : जालना घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली. यात अनेक बसेसचा देखील समावेश असल्याने खबरदारी म्हणून राज्यातील अनेक भागातातील बससेवा बंद करण्यात आली. नाशिकमध्ये बस सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाश्यांचे हाल झाले. शहरातील बस स्थानकातून विविध मार्गांवरील सुमारे १५० बस फेरया रदद करण्यात आल्या. रविवार दि. ३ रोजी महाराष्ट्र बंदमुळे बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाशिक शहरातील जुने सीबीएस, ठक्कर बझार, मुंबई नाक्यावरील महामार्ग बसस्थानकातून विविध मार्गांवर बसेस सोडल्या जातात. ठक्कर बझार बस स्थानकातून धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे मार्गावर बसेस धावतात. महामार्गावरून मुंबई, कसारा, नगर, सोलापूर, कोपरगाव आदी मार्गांवर बसेस धावतात. राज्यभरात मराठा आंदोलन पेटत असल्याने जिल्ह्यातील काही भागातील बससेवा बंद ठेवण्यात आली. बसेसचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळाने निर्णय घेतल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.

- Advertisement -

नाशिकमधून काही मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. यात नाशिक पुणे मार्गावर धावणारया बसेस या संगमनेर बस स्थानकापर्यंतच धावल्या. संगमनेरपासून पुढे पुण्याच्या दिशेने बसेस सोडण्यात येत नव्हत्या तर औरंगाबाद मार्गावरील बसेस या येवल्यापर्यंत तर नंदुरबार मार्गावरील बसेस सटाणापर्यंतच सोडण्यात आल्याने प्रवाश्यांचे मात्र हाल झाले. त्यामुळे या प्रवाश्यांना पुढील प्रवास खासगी बसेसने करावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनीही दरवाढ करत प्रवाश्यांच्या गैरसोयीचा फायदा घेतला. रविवार ३ सप्टेंबर रोजी मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. त्यामुळे रविवारीही बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या मार्गावरील बसफेऱ्या रद्द 

  • नाशिक ते छ. संभाजी नगर
  • नाशिक ते शिर्डी
  • नाशिक ते पुणे
  • नाशिक ते जळगाव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -