घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखड्ड्यात कुंडी ठेऊन महानगरपालिकेने दिला 'नाकर्तेपणाचा दाखला'

खड्ड्यात कुंडी ठेऊन महानगरपालिकेने दिला ‘नाकर्तेपणाचा दाखला’

Subscribe

नाशिक : मागील सहा महिन्यापासून नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. अनेकांना शारीरिक व्याधी खड्ड्यांमुळे सुरू झाल्या आहेत. तसेच, मानसोपचार तज्ञांच्या मते नागरिकाच्या मानसिक स्वास्थावरही खराब रस्त्यांचा परिणाम झाला आहे. त्यात खराब रस्त्यांनामुळे झालेल्या अपघातामुळे कित्येकांना अपंगत्व आले आहे. खड्डे, खराब रस्ते यांच्याबाबत सामान्य नागरिक, विविध पक्ष-संघटना, वृत्तपत्र, माध्यम यांनी आक्रोश करूनही महानगपालिका प्रशासन मात्र अतिशय ढीम्म असल्याच आपल्याला बघायला मिळालय. अश्यातच नवीन नाशिक विभागातील खड्ड्यांवरील उपाय महानगरपालिकेच्या नाकर्तेपणाचा दाखलाच म्हणता येईल.

नवीन नाशिक मधील अंबड पोलीस स्टेशन ते अंबड एमआयडीसी रोडवरील एका मोठ्या खड्ड्यांत महापालिकेने चक्क झाडाची कुंडी ठेवत, आपल्या नाकर्तेपणाचा दाखला दिला आहे. महापालिकेच्या या कारभारामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांत मात्र चांगलाच रोष आहे. अंबड औद्योगिक वसाहतीनजीक असलेल्या सिंहस्थ नगरातील छत्रपती संभाजी स्टेडियमसमोर महापालिकेने पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदला आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीकडून गणेश चौकाकडे येणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरुन दुतर्फा वाहतूक सुरू आहे. याच स्टेडियमसमोर त्रिफुलीवर मोठा खड्डा पडला आहे. वास्तविक पालिकेने हा खड्डा तातडीने बुजविणे गरजेचे असताना त्याऐवजी पालिकेने या खड्ड्यात झाडाची कुंडी ठेवून आपली बौद्धिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -