नांदेडमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात; ४ जण ठार, एक महिला जखमी

कार (Car) आणि ट्रकचा (Truck) भीषण अपघात (Accident) चार जणांचा मृत्यू झाला असून, एक गरोदर महिला (Women) जखमी झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. शंकर जाधव, महानंदा जाधव, कल्पना शिंदे, धनराज जाधव अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

कार (Car) आणि ट्रकचा (Truck) भीषण अपघात (Accident) चार जणांचा मृत्यू झाला असून, एक गरोदर महिला (Women) जखमी झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. शंकर जाधव, महानंदा जाधव, कल्पना शिंदे, धनराज जाधव अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ही घटना शुक्रवार तीन जून रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. नांदेड-देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ ट्रकने कारला धडक दिली. दरम्यान या अपघातातील जखमी स्वाती शिंदे नावाच्या महिलेवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसी कडून देगलूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला (Car accident) समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. नायगाव तालुक्यातील रातोळीमधील टाकळी येथील जाधव कुटुंब शंकरनगरकडे जायला निघाले होते. मात्र कुंचेली फाट्यावर या कुटुंबाच्या गाडीला एका भरधाव ट्रकने समोरून धडक दिली.

हेही वाचा – Karnatak Accident : गोवा-हैदराबाद ट्रॅव्हल्स बसला भीषण, ७ जण जागीच ठार, १३ जण जखमी

स्विफ्ट कारला जोरदार धडक

AP 03 TA 3186 नंबरच्या ट्रकने जाधव कुटुंबीयांच्या MH 25 T 1075 क्रमांकाच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कुटुंबातील ४ जण जागीच ठार झाले तर एक गरोदर महिला जखमी आहे.

महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प

या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत, अपघाताचा तपास केला. दरम्यान रात्री ८:३० वाजताच्या सुमारास हा अपघाता झाल्याने या महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. तसेच, कार चालक शंकर जाधव यांना या अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – शिवसेना आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये