Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; दोन परप्रांतीय मजूर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) मागील काही दिवसांपासून हिंदूना टार्गेट केले जात आहे. दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या गोळीबारामुळे (Terror Attack) येथील काश्मिरी पंडितांनी एकत्र पलायनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दहशतवाद्यांनी परप्रांतीय कामगारांवर हल्ला केला.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) मागील काही दिवसांपासून हिंदूना टार्गेट केले जात आहे. दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या गोळीबारामुळे (Terror Attack) येथील काश्मिरी पंडितांनी एकत्र पलायनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दहशतवाद्यांनी परप्रांतीय कामगारांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या १० घटना घडल्या असून, आता दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) शोपियानमध्ये (Shopian) दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केलं आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधीत परिसरात तपासाला सुरूवात केली. सुरूवातीला गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी आणखी तपास केला असता, सिलेंडरच्या स्फोटामुळे नसून, तर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

दोन प्रवासी मजूर जखमी

पोलिसांच्या (Jammu & Kashmir Police) माहितीनुसार, शोपियानच्या आगलार झैनापोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, ज्यामध्ये दोन प्रवासी मजूर जखमी झाले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मागील २४ तासांत तिसरा दहशतवादी हल्ला झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. यामध्ये अनेक काश्मिरी पंडितांना आपला जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे येथील पंडितांनी आता एकत्र पलायनाचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या भीतीने सुरक्षेसाठी ३००० हून अधिक काश्मिरी पंडितांनी पलायन केल्याचे समजते. त्यामुळे आता पोलिसांकडून या नागरिकांना सुरक्षा कशी दिली जाणार आणि दहशतवाद्यांच्या खात्मा कधी करणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले

  • ४ जून – परप्रांतीय मजूरांवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला
  • २ जून – गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला.
  • ३१ मे – कुलगाममधील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.
  • २५ मे – काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.
  • २४ मे – दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.
  • १७ मे – बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
  • १२ मे – काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.
  • १२ मे – पुलवामा येथे पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
  • ९ मे – शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले.
  • २ मार्च – कुलगाममधील संदू येथे दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या केली.


हेही वाचा – काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होतेय, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक