शिवसेना आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सर्व सहयोगी विधानसभा सदस्यांना ८ जूननंतर आपल्या मतदारसंघात न थांबला तातडीने मुंबईत हजर राहायचे आहे. या सदस्यांची राहण्याची व्यवस्था नरिमन पॉईट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आली आहे.

cm uddhav thackeray ordered to Shiv Sena MLAs come to Mumbai for Rajyasabha election
शिवसेना आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश, घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये

राज्यसभेची निवडणूक अटळ बनल्याने शिवसेनेने पुढच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी सेना नेत्यांची बैठक घेऊन शिवसेना आणि पक्षाच्या सहयोगी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत.या आमदारांचा मुक्काम तूर्त पंचतारांकित हॉटेलमध्ये असणार आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सर्व सहयोगी विधानसभा सदस्यांना ८ जूननंतर आपल्या मतदारसंघात न थांबला तातडीने मुंबईत हजर राहायचे आहे. या सदस्यांची राहण्याची व्यवस्था नरिमन पॉईट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आली आहे.

दरम्यान, परवा, सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षावर आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना आणि सहयोगी आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आमदारांना बंदोबस्तात ठेवण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते.

घोडेबाजार होणार

राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha elections) होत आहे. पंरतु या जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. परंतु यामध्ये घोडेबाजार होणार असून ऐकण्यात नसेल एवढी किंमत असेल अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


हेही वाचा : Rajya Sabha elections: मतदानासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयात अर्ज