Karnatak Accident : गोवा-हैदराबाद ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, ७ जण जागीच ठार, १३ जखमी

गोव्यावरून हैदराबादला (Goa – Hyderabad) जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा भीषण (Accident) अपघात झाला आहे. या अपघातात सात प्रवासी जागीच ठारे झाले आहे. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात कर्नाटकच्या कुलबर्गी येथील परिसरात झाला आहे. गोव्याहून हैदराबादला जाणारी ट्रॅव्हल्स मिनी बसला (Mini Travel Bus) धडकल्याने हा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

कसा झाला अपघात ?

बस एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडकली असून स्टेअरिंगवरून ताबा सुटून ती पुलावरून खाली पडली. त्यामुळे बसला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेमुळे सात प्रवाशांचा जीव घेतला आहे. जवळपास १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना झाली तेव्हा बसमध्ये चालक आणि दोन क्लिनरसह एकूण ३५ लोक उपस्थित होते.

भीषण अपघातानंतर प्रवाशांचा उडाला गोंधळ

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर खासगी बसला आग लागल्याने अनेक प्रवाशांचा गोंधळ उडाला. मालवाहू टेम्पोच्या चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर आता कुलबर्गी येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देखील पोलिसानी दिली आहे.

गाड्यांच्या धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या गाडीला आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी कर्नाटक पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. बसला आग लागल्यानंतर त्या बसमधून २२ प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळाले आहे. तर काही प्रवासी तसेच अडकून पडले आहेत. मात्र, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे.


हेही वाचा : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी – खासदार संजय राऊत