घरदेश-विदेशभाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल

भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल

Subscribe

गणेश नाईक यांच्याबरोबर १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असून आपल्याला एक १५ वर्षांचा मुलगा देखील असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

नवी मुंबईतील दिग्गज नेते भाजप आमदार गणेश नाईक आता चांगलेच अडचणीत आले आहेत. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने याबाबत तक्रार दिली होती.

गणेश नाईक यांच्याबरोबर १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असून आपल्याला एक १५ वर्षांचा मुलगा देखील असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. आपल्या मुलाला नाईकांचे नाव मिळावे आणि संपत्तीत अधिकार मिळावा अशी आपली मागणी असून या मागणीमुळे गणेश नाईक हे आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे महिलेने म्हटले आहे.

- Advertisement -

सीबीडीतील गणेश नाईक यांनी त्यांच्या कार्यालयात मार्च 2021 मध्ये आपल्यावर रिव्हॅालव्हर रोखले आणि ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून स्वतःच्या आणि आपल्या मुलाला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे.

पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात याआधी तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर तिने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई कण्याच्या सूचना दिल्या. तसेच गणेश नाईक यांनी डीएनए चाचणी करावी आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -