घरलोकसभा २०१९तडका वादाचाभाजपच्या आमदार मंदा म्हात्रे म्हणतात दोन वेळा मतदान करा

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे म्हणतात दोन वेळा मतदान करा

Subscribe

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील माथाडी कामगारांना दोनदा मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबईतील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दोनदा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी संध्याकाळी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नवी मुंबई शहर हे ठाणे लोकसभा मतदारसंघात येते. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ठाण्यातील युतीचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगार काम करतात. त्यांना संबोधित करताना मंदा म्हात्रे म्हणाल्या की, २३ एप्रिल रोजी सातारा येथे जाऊन मतदान करावे आणि २९ एप्रिलला पुन्हा ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनाही मतदारन करावे, असे वादग्रस्त वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले.

मंदा म्हात्रे यांचे वादग्रस्त वक्तव्य | माथाडी कामगारांना दोनदा मतदान करण्याचे केले आवाहन | #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 14, 2019

- Advertisement -

 

मंदा म्हात्रे या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा २०१४ साली नवी मुंबईत दोनदा मतदान करण्याचे आवाहन केले होते. मंदा म्हात्रे यांनी पवार यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत सांगितले की, जर पवार दुबार मतदानाचे आवाहन करु शकतात तर आपण का नाही? मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -