घरमहाराष्ट्रआम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी...

आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं

Subscribe

युती तोडल्यावरुन भाजप सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे. सोमवारी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचलं. ते नांदेड येथे बोलत होते.

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलं आहे. साबणे यांनी आज शिवबंधन सोडत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. आम्ही पंढरपूर जिंकलो. तीन पक्षांच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखान्यांच्या निवडणुका जिंकलो. कराडच्या कृष्णा कारखान्यात २१ च्या २१ जागा आम्ही जिंकल्या. हे तीन पक्ष एकत्र आले तर तरी आम्ही देगलूरची जागा जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेला सर्वाधिक मतदान आण्हाला मिळालं. आम्हाला २० आमदार कमी पडले. आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाचही जागा आल्या नसत्या, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचलं.

रडणाऱ्याला शिवसेनेत स्थान नसतं – राऊत

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी आमदार सुभाष साबणे यांच्या भाजप प्रवेशावरुन जोरदार टोला लगावला. गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकं स्वत:च्या पक्षात घेत होते. भाजपकडे स्वत:चं काही नाही आहे. काल निवडणूक लढण्यासाठी आमचा माणूस घेतला तो देखील रडका. शिवसैनिक परिस्थितीविरुद्ध हा रडत नाही लढतो. रडणाऱ्याला शिवसेनेत स्थान नसतं. पळपूट्यांना शिवसेनेत स्थान नसतं. भाजपने जे काय नवीन धोरण सुरु केलं आहे. स्वत:चं असं काही नसल्यामुळे दुसऱ्यांचे लोकं घ्यायचे आणि स्वत:ची सूज वाढल्याची दाखवायची. पण हे फार काळ चालत नाही, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -