घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील ऐकणार राज ठाकरेंचे भाषण

चंद्रकांत पाटील ऐकणार राज ठाकरेंचे भाषण

Subscribe

नाशिक दौऱ्यावरील राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात झाली चर्चा, पत्रकार परिषदेत पाटलांनी मांडली भूमिका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही नाशिक दौऱ्यावर असून, दोघेही शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी आहेत. आज सकाळी या दोघांंची विश्रामगृहावर भेट झाली. त्यात राजकीय आणि इतर सर्वच परिस्थितीवर चर्चा झाली. परप्रांतियांविषयीची राज ठाकरेंची जी भूमिका आहे, त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. मात्र, ही भूमिका समजून घ्यावी, यादृष्टीने बिहारमध्ये व्हायरल झालेला राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओ आपण ऐकणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. व्हायरल झालेला तो व्हिडिओ राज ठाकरे आज चंद्रकांत पाटील यांना पाठवणार आहेत.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी या भेटीसंदर्भात माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपची १३ जणांची कोअर टीम त्या व्हिडिओबाबत चर्चा करणार आहे. मी एकटा त्याबाबत निर्णय घेऊ शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच घोषणादेखील केलेली आहे. त्यामुळे या भेटीतून फार काही वेगळे घडणार नसल्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -