घरमहाराष्ट्रओमायक्रॉनबद्दल मंत्रिमंडळात चिंता परदेशातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी कशी करणार?

ओमायक्रॉनबद्दल मंत्रिमंडळात चिंता परदेशातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी कशी करणार?

Subscribe

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यासंदर्भात पंतप्रधानांना देखील अवगत करण्यात यावे, यावर बैठकीत चर्चा झाली.

उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असेही सांगितले.

- Advertisement -

कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासंदर्भात सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणार्‍या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी. जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल, असे सांगितले.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरिएंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच ७ दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

परदेशातून राज्यात येणारी विमाने रोखण्याची शक्यता
ज्या १२ देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळले आहेत तेथून येणार्‍या विमानांवर बंदी घालती पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही विमाने महाराष्ट्रात येण्यापासून रोखली पाहिजेत. त्यासंदर्भात नागरी वाहतूक विभागाला आपण एक पत्र लिहिणार आहोत. त्यांनी ऐकले तर ठीक नाहीतर आपण विमानांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. आपल्या राज्यात ओमायक्रॉन येऊ नये म्हणून काळजी घेणे महत्वाचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. परदेशातून येणार्‍या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्यांची ४८ तासांसाठी चाचणी केली जाईल. जर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पुढील प्रक्रिया केली जाईल. परंतु निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना होमक्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ८ दिवसांनी त्यांची आरटीपीसीआर करून त्यांची तब्येत कशी आहे याबाबत खात्री केली जाईल, असे टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -