घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रछगन भुजबळ यांना करोनाची लागण; प्रकृती अस्वस्थता जाणवू लागल्याने केल्या होत्या तपासण्या

छगन भुजबळ यांना करोनाची लागण; प्रकृती अस्वस्थता जाणवू लागल्याने केल्या होत्या तपासण्या

Subscribe

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ सोमवारी (दी.२७)  शाहिद अजित शेळके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तसेच मतदारसंघातील कामाचा आढावा घेण्यासाठी येवल्यात गेले होते. मात्र, त्याठिकणाहून परतताना त्यांना अचानक प्रकृती अस्वस्थता जाणवू लागल्याने नाशिक शहरातील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची तपासणी करून डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच घरीच सक्तीच्या आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मंगळवारी त्यांच्या केलेल्या तपासण्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

येवल्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना काही दिवासपूर्वी देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. लागलीच त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -
मविआ’च्या संयुक्त सभेला अनुपस्थिती राहण्याची शक्यता 

येत्या २ एप्रिल महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. छगन भुजबळ यांच्याकडे देखील राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यांना आता कोरोनाची लागण झाल्याने तसेच त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या आरामाचा आणि विलगीकरणाचा सल्ला दिल्याने भुजबळ महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला अनुपस्थित असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -