घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमुख्यमंत्र्यांची आज पैठणमध्ये कावसानकर मैदानावर सभा, मैदानावर गाजले होते बाळासाहेब ठाकरेंचे भाषण

मुख्यमंत्र्यांची आज पैठणमध्ये कावसानकर मैदानावर सभा, मैदानावर गाजले होते बाळासाहेब ठाकरेंचे भाषण

Subscribe

औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते पैठण येथे जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, ते ज्या कावसानकर मैदानावर जाहीर सभा घेत आहेत, त्या मैदानाला मोठा राजकीय इतिहास आहे. याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जाहीर सभा झाली होती. त्यामुले आजची सभा महत्त्वाची समजली जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मैदानावरून कुणावर निशाणा साधणार याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणच्या कावसानकर मैदानावर आज दुपारी दोनच्या दरम्या जाहीर सभा होणार आहे. या मैदानावर 21 डिसेंबर 1947 ला बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभा घेतली होती. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांच्या या सभेसाठी जिल्हाभरातून लोकं सकाळपासून मैदानावर येऊन बसले होते. या सभेत मुस्लिमांची संख्या मोठ्याप्रमाणात होती. बाळासाहेबांची ही सभा प्रचंड गाजल्याचे बोलले जाते. आज ही सोशल मीडियावर या सभेतील बाळासाहेबांचे भाषण व्हायरल होताना पाहायला मिळते. आता त्याच मैदानावर शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे.

- Advertisement -

सभेला हे मंत्री लावणार हजेरी  –

पैठण येथे होत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिंदे गट आणि भाजप मधले अनेक मंत्री हजेरी लावणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे,रोहयो मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यासह आणखी काही मंत्री या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष –

बाळासाहेबांनी घेतलेल्या मैदानावर त्यांची सभाही होते आहे. दसऱ्या मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची सभा होणार यावरून वाद सुरू आहे. पण त्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर आता एकनाथ शिंदेंचं भाषण गाजणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -