गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार; आरोग्यमंत्री सावंतांची माहिती

गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Tanaji Sawant
तानाजी सावंत

गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच, लहानमुलांमध्ये गोवरची लागण सर्वाधिक होत असल्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही तानाजी सावंत यांनी केले. (Children infected with measles will be isolated for 7 days Information from Health Minister Sawant)

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील गोवर रुग्णांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “गेले 15 ते 20 दिवस मुंबई आणि काही ठराविक भागात गोवर वाढत आहे. या गोवरची सुरूवात मुंबईत झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रालयात बैठकी घेतल्या. तसेच, पुढे कस काम करायचं यावर चर्चा झाली. सर्व आयुक्तांना गोवर विषयी आदेश देऊन काम कार्यरत आहे. मी स्वतः हॉस्पिटल मध्ये जाऊन देखभाल केली. 14 बालकाचे मृत्यू झाले आहेत, त्यापैकी 1 बालकाचे लसीकरण झाले नव्हते. यामध्ये 6 मुली आणि 8 मुलांचा समावेश आहे”

“गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत 825 सर्वेक्षण पथक आहेत. आतापर्यंत 9 लाख 80 हजार 883 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. गोवरच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्राची बैठक पार पडली. त्यामध्ये जास्त गोवरचे रुग्ण आहेत. आशा वर्कर देखील काम करत आहेत. काही भागात लसीकरण करण्याविषयी जनजागूर्ती केली जात आहे. यामध्ये धर्मगुरूंचा देखील समावेश आहे. ज्या बालकाला गोवर झालेला आहे, त्याला स्प्रेडर होऊ नये, यासाठी त्याला 7 दिवस त्याच ठिकाणी ठेवायचे आहे. ज्यांना गोवर असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि आशा वर्कर यांना दिल्या आहेत”, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.

“खाजगी रुग्णालयात जे बालक उपचार घेत असतील तर त्यांनी सरकारी कार्यालयात कळवणे गरजेचे आहेत. त्यामुळे मुलांची माहिती आम्हाला देखील घेतल्या आहेत. जानेवारी पर्यंत ही लाट कमी प्रमाणात राहू शकेल असा अंदाज आहे. सरकार चांगल्या पद्धतीने काम करतय त्यामुळे हे आरोप केले जात आहेत. आम्ही व्यवस्थित काम करतोय याचा आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः प्रशासनाकडून घेतोय. कोरोना पेक्षा जास्त स्प्रेड होतोय हे असं दिसत नाही आमच्या सर्वे मध्ये देखील असं नाही आहे. गोवरचा उद्रेक 68 ठिकाणी झाला आहे. आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे लसीकरण पुरेपूर आहे”, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.


हेही वाचा – ताईला सगळं माहितीय…; ‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीटमधून नक्की कोणावर केले आरोप?