घरमहाराष्ट्रभास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेवर अरेरावी, पुण्यात जाधवांविरोधात 'जोडे मारो आंदोलन'

भास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेवर अरेरावी, पुण्यात जाधवांविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’

Subscribe

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापारी वर्गाला धीर देत पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वकष योजना जाहीर करेन असे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री पूरग्रस्त महिलेची व्यथा ऐकून घेत असताना शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेवर मुख्यमंत्र्यांसमोर अरेरावीची भाषा वापरली.   या प्रकरणावरून आता भास्कर जाधवांविरोधात चांगलाच संताप सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. याचपार्श्वभूमीवर आज पु्ण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या फोटोला जोडे मारुन त्यांनी चिपळूणमधील बाजारपेठेत पूरग्रस्त महिलेसोबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी पुणे भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकणातील महापूरामुळे सामान्य नागरिकाची खूप मोठी वित्तहानी झालीय. मात्र यावेळी उद्धट निर्लज्ज भास्कर जाधवांचे वागणं आणि बोलणं साऱ्या जगाने पाहिले. कोकणवासीय तर यांना धडा शिकवतील पण भास्कर जाधव यांच्या बेजबाबदार वागण्याचा आज भाजपा पुणेच्या वतीने आम्ही जोडे मारो आंदोलन करत निषेध करतो, असं पुणे भाजपाचे अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोर एका महिलेला दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, जाधवांविरोधात चांगलाच संताप व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये व्यापारांचे महापूरामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावेळी पूरग्रस्त महिला दुकानदार स्वाती भोजने दुकानसमोर उभ्या राहून मुख्यमंत्र्यांना आले गाऱ्हाणी सांगत होत्या.

माझं घर गेलं, माझं दुकान गेलं. तुम्ही काहीतरी करा…”, असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..”. असं अगदी रडत रडत स्वाती सांगत होत्या. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं.

- Advertisement -

मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित असलेले चिपळूनचे स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावीचा भाषा करत स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना अगदी अरेरावीच्या भाषेत सांगितले. त्यावर फूल ना फुलाचा पकळी समजून आम्हाला मदत करा अशी मागणी स्वाती यांनी केली.

मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे होताच भास्कर जाधवांनी मागे वळून “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय” असं हातवारे करुन विचारलं. त्यानंतर स्वाती यांच्या मुलाला, “आईला समजव… आईला समजव… उद्या भेट” असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचे आमंत्रणही जाधवांनी थेट धमकी दिल्यासारखे दिले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच जाधवांनी पूरग्रस्त स्वाती भोजणे यांची माफी मागावी अशी मागणी जोर धरतं आहे.


Coronavirus Vaccine : सप्टेंबरपर्यंत येणार ‘Corbevax’ ही आणखी एक स्वदेशी लस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -