घर महाराष्ट्र चित्रा वाघांची राऊतांवर पुन्हा टीका; म्हणाल्या, किती हुजरेगिरी करणार...

चित्रा वाघांची राऊतांवर पुन्हा टीका; म्हणाल्या, किती हुजरेगिरी करणार…

Subscribe

 

मुंबईः द केरळ फाईल्स चित्रपटावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. घंटा बडवणारं हिंदुत्व नसल्याची आरोळी ठोकणारे हे महाशय मुस्लिम मतांसाठी छाती बडवताहेत. आणखी किती हुजरेगिरी करणार आहात? बाटगा जास्त कोडगा असतो हे राऊतांनी दाखवून दिलंय, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

- Advertisement -

चित्रपटांसारख्या कलाकृती हा समाजमनाचा आरसा असतो. पण ज्यांचं मन सतत वेटोळे घेतं त्यांना स्वतःला आरशात पाहिलं तरी सापच दिसतो. सध्या अशीच अवस्था झालीय, सर्वज्ञानी संजय राऊतांची, असा निशाणा चित्रा वाघ यांनी ट्वीट करुन संजय राऊद यांच्यावर साधला आहे.

केरळ फाईल्स चित्रपटावरून सध्या रणंकदन सुरु आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये या चित्रपटावरून आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. त्यात संजय राऊत यांनीही या चित्रपटावरून भाजपवर टीका केली होती.  असे चित्रपट हाच भाजपचा प्रचाराचा मार्ग असतो. निवडणूक आली की, अशा प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि लोकांना दाखवायचे. त्यांनी एक प्रोपगंडा चित्रपट बनवला आहे. यामध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे हिंदू आणि मुसलमानांचा. या मुद्द्याशिवाय हे लोक निवडणुकीला सामोरे जात नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याला चित्रा वाघ यांनी ट्वीट करुन उत्तर दिले.

- Advertisement -

वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अशातच ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाई करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

- Advertisment -