घरमहाराष्ट्रमी रुपाली चाकणकरांना उद्देशून शुर्पणखा शब्दा वापरला नाही - चित्रा वाघ

मी रुपाली चाकणकरांना उद्देशून शुर्पणखा शब्दा वापरला नाही – चित्रा वाघ

Subscribe

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सकाळपासून सुरु आहे. यानंतर भाजप महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका, असं ट्विट केलं होतं. यानंतर राजकीय वादळ उठलं होतं. यावर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी रुपाली चाकणकरांना उद्देशून शुर्पणखा शब्दा वापरला नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्विट केलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आता कुठे राज्यातली जनता सावरतेय. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणत एक जबाबदार नागरीक म्हणून आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं आहे, असं चाकणकर म्हणाल्या. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना चित्रा वाघ यांनी आपण ट्विटमध्ये रुपाली चाकणकर यांचं नावच घेतलं नव्हतं, असं स्पष्टीकरण दिलं आहे. “अशा ठिकाणी राजकीय महिलांची नियुक्ती साधारणपणे केली जाते. तिथे येणाऱ्या महिलेने शुर्पणखासारखी रावणांना मदत करू नये. मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही. पण कुणी स्वत:च्या अंगाला लावून शुर्पणखा झालं असेल तर मला त्याबद्दल कल्पना नाही,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या, तर त्यांना विरोध करणारी मी कोण आहे? त्या बसल्या, तर त्यांना शुभेच्छाच आहेत, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -