घर ताज्या घडामोडी शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Subscribe

शिर्डीतील साई संस्थान परिसरात साई भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंदिरात जाण्यापासून रोखल्यामुळे हा वाद पेटल्याचं सांगितलं जात आहे.

शिर्डीतील साई संस्थानमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या काळात राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर पालख्या शिर्डीत येत असतात. त्यानुसार यंदाही शिर्डीत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तर आज या उत्सवाची सांगता असून या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत.

- Advertisement -

यामध्येच मुंबईची साईलीला पालखी ही गेट क्रमांक पाचमधून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर या पालखीतील भाविकांचं काहीतरी सामान आतमध्ये राहिलं. त्यामुळे एकानं ते आणण्यासाठी या गेटमधून पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला सुरक्षा रक्षकाने रोखलं. त्यामुळे वाद निर्माण झाला. या वादाचं रुपांतर भांडणात झाल्यामुळे साई भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली.

या प्रकारानंतर मंदिर परिसरात काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिर्डीत अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सुरक्षा रक्षकाच्या वादातून अशा हाणामाऱ्या यापूर्वीही झाल्या आहेत. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


- Advertisement -

हेही वाचा : माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस


 

- Advertisment -