घरदेश-विदेशअरुण जेटली यांचं जाणं अत्यंत क्लेशदायक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अरुण जेटली यांचं जाणं अत्यंत क्लेशदायक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. देशाच्या राजकारणातला दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. अरुण जेटली यांची उणीव कायम भासेल, जेटलींचं जाणं अत्यंत क्लेशदायक आहे. मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. अरुण जेटली यांची पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याशी मी फोनवरुन चर्चा केली. तुमच्या दुःखात सहभागी आहे, असे सांगत मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, असेही मोदी यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही दौरा रद्द करु नका, असे त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला सांगितले असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्विट मोदींनी केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दौरा रद्द करणार नसून पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

या नेत्यांनीही वाहिली आदरांजली –

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -