घरमहाराष्ट्रपुणेCM Eknath Shinde आणि Sharad Pawar नाट्यसंमेलनानिमित्त एकाच मंचावर, पण Ajit Pawar...

CM Eknath Shinde आणि Sharad Pawar नाट्यसंमेलनानिमित्त एकाच मंचावर, पण Ajit Pawar…

Subscribe

पुणे : अखिल भारतीय मराठी 100व्या नाट्यसंमेलनाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली आहे. या संमेलनाची नाट्य दिंडी आज (ता. 06 जानेवारी) पिंपरीत काढण्यात आली. या दिंडीला मराठी सिनेतारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. या नाट्यसंमेलनाची राज्यातील रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे या नाट्यसंमेलनाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातही या नाट्यसंमेलनाला राजकीय वळण मिळाल्याने हा कार्यक्रम रंगकर्मींचा आहे की राजकारण्यांचा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. तर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार होते. त्यानुसार शरद पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. ज्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने काका-पुतण्याची जोडी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. पण ते या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी माहिती कालच अजित पवारांकडून देण्यात आली होती. (CM Eknath Shinde and Sharad Pawar on same stage for Nathyasamela, but Ajit Pawar…)

हेही वाचा… Thackeray faction : गुजरातची चमचेगिरी मराठी माणसाच्या मुळावर, राज्य सरकारवर घणाघात

- Advertisement -

पुण्यातील नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीनंतर उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरदग पवार उपस्थि होते. पण कालच अजित पवारांनी सांगितल्याप्रमाण ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. “नाही नाही.. माझं नाव कुठेही टाकतात,” असे म्हणत या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. पण काका शरद पवार हे व्यासपीठावर असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले, असे आता सांगण्यात येत आहे.

परंतु, या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांकडून हा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. तर, उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनात हा सत्कार नमूद नव्हता. अजित पवारांनी ज्यांच्यामुळे मंचावर येणे टाळले, त्याच शरद पवारांचा सत्कार करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याने आता विविध चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोबतच उपस्थितांमध्ये करण्यात येत आहेत.

- Advertisement -

तब्बल 25 वर्षानंतर शहरात नाट्यसंमेलन होत आहे. याआधी 79 वे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पडली होती. यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -