घरमहाराष्ट्रपुणेRailway Mega Block : पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; 13 गाड्या रद्द

Railway Mega Block : पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; 13 गाड्या रद्द

Subscribe

पुणे : रविवारी (7 जानेवारी) सुट्टीनिमित्त पुणे-लोणावळा याठिकाणी फिरायचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही उद्या पुणे-लोणावळा या मार्गावर रेल्वेने प्रवास करणार असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडा. कारण या मार्गावर पुणे विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, तर एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार आहे. (Railway Mega Block on Pune Lonavala route on Sunday 13 trains cancelled)

हेही वाचा – Sharad Mohol Murder : तिघांनी झाडल्या गोळ्या, आरोपींसोबत दोन्ही वकील एकाच गाडीमध्ये – Pune Police 

- Advertisement -

अप मार्गावरील उपनगरी गाड्या रद्द

अप मार्गावरील पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562, 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564, 3 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566, शिवाजीनगरहून तळेगाव करीता 3.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588, पुण्याहून लोणावळासाठी 4.26 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568, शिवाजीनगरवरून लोणावळाकरीता 5.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 या उपनगरी गाड्या रद्द राहतील.

डाऊन मार्गावरील उपनगरी गाड्या रद्द

डाऊन मार्गावरील लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, लोणावळ्याहून पुण्यासाठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561, तळेगाव येथून पुण्यासाठी जाणारी 4.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता 05.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 06.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 आणि लोणावळ्याहून पुण्यासाठी 7 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 या उपनगरी गाड्या रद्द राहतील.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray faction : गुजरातची चमचेगिरी मराठी माणसाच्या मुळावर, राज्य सरकारवर घणाघात

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस 03.30 तास उशिराने धावणार आहे. मध्य रेल्वेने म्हटले की, हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -