घरताज्या घडामोडीहे निंदनीय, वैयक्तिक द्वेषातून मोदींचा एकेरी उल्लेख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

हे निंदनीय, वैयक्तिक द्वेषातून मोदींचा एकेरी उल्लेख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

Subscribe

जळगावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी भरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे भाजपासह शिंदे गट देखील संतापले आहेत. यावेळी हे निंदनीय असून वैयक्तिक द्वेषातून मोदींचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हे दुर्देवी वक्तव्य आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं नेतृत्व संपूर्ण जगभरात सिद्ध केलंय. या देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे जी-२०चं अध्यक्षपद आम्हाला मिळालेलं आहे. मोदींच्या कुटुंबांची आणि त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांची निंदा आणि निषेध करणं हे अगदीच थोडं आहे. प्रत्येक देशाला आणि माणसाला गर्व वाटावा, असं काम मोदींनी केलंय. त्यांच्या मातोश्रीचं दुख:द निधन झाल्यानंतर आणि अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी पहिलं प्राध्यान्य कर्तृत्वाला दिलं. या देशातील प्रकल्पाला प्राधान्य दिलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

कालचं वक्तव्य हे द्वेषातून आणि वैयक्तीक करण्यात आल्याचं दिसून येतंय. जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते आणि समोरच्या यशस्वी व्यक्तीमुळे पोटदुखी जेव्हा निर्माण होते. त्यावेळी अशाप्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोकं करतात. ज्यांनी २५ वर्ष युतीत काम केलं, त्यांच्याबाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो?, हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

महसुल विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांची वातावरणीय बदल, तापमान, गारपीट या विषयावर एक परिषद आहे. या परिषदेत सध्या जे काही वातावरणात बदल झाले आहेत. त्यावर या परिषदेत चर्चा होईल. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्याच्या दृष्टीने यामध्ये महत्त्वाच्या चर्चा होतील. तसेच त्यावर उपाययोजना देखील होतील, असंही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही.., भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -