Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'आज देश चंद्रावर चाललाय पण काही लोक घरात बसूनच', मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर...

‘आज देश चंद्रावर चाललाय पण काही लोक घरात बसूनच’, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

'आज देश चंद्रावर चालला आहे. पण काही लोक घरात बसूनच राज्याचा कारभार ऑनलाइन करत होते', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

‘आज देश चंद्रावर चालला आहे. पण काही लोक घरात बसूनच राज्याचा कारभार ऑनलाइन करत होते’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. परभणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला. (CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray)

“आज देश चंद्रावर चालला आहे. पण काही लोक घरात बसूनच राज्याचा कारभार ऑनलाइन करत होते. पण आम्ही करंट दिला. एक झटका दिला आणि ऑनलाइनवरून डायरेक्ट लाइनवर आणण्याचे काम केलं. त्यामुळे आम्ही कामाला महत्व देतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

“कितीही ओरडा सकाळी, दुपारी, संध्याकाळी भोंगे लावा. परंतु, तुमचे भोंगे शिव्या श्राप देण्यासाठी आहेत, हे लोकांना माहीत आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी तुमचे भोंगे आहेत. पण एखादी चांगली सुचना करण्यासाठी कधीच तुमचा भोंगा वाजला नाही. परंतु, शासनाचा भोंगा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून वाजतोय”, अशीही टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

पाठण्यातील विरोधकांच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

“आम्ही पाठणपासून योजनांचे लाभ द्यायला सुरूवात केली. पण काही लोक पाठण्यामध्ये जमा झाले होते. तिथे द्वेशाची आणि स्वार्थाची किचडी पकवू लागले. परंतु, या देशाला पुढे न्यायचे असेल, आर्थिक विकास करायचा असेल तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. तसेच, या राज्याच्या विकासाचा काम सुरू आहे. अनेक प्रकल्प, पायाभूत सुविधा, मेट्रो आणि रस्त्यांचे काम सुरू आहे. आज ताकदीचे सरकार ताकदीने काम करत आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


- Advertisement -

हेही वाचा – परभणीत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisment -