घरताज्या घडामोडीपरभणीत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणीत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाची गंगा येत्या काळात परभणीत आणल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य केले.

परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाची गंगा येत्या काळात परभणीत आणल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य केले. तसेच, सध्या सुरू असलेला विकास हा केवळ मुंबई, पुणे, नागपूर या भागांत न सुरू ठेवता गडचिरोलीपासून परभणीपर्यंत सर्वत्र विकास केला जाणार आहे, असेही म्हटले. (There will be big development in Parbhani says CM Eknath Shinde)

“परभणी ही संतांची भूमी आहे. संतांची भूमी असलेल्या मातीत नम्र आणि सहनशील अशा परभणीत शासनाच्या माध्यमातून काम करणार आहोत. सध्या सुरू असलेला विकास हा केवळ मुंबई, पुणे, नागपूर या भागांत न सुरू ठेवता गडचिरोलीपासून परभणीपर्यंत सर्वत्र विकास केला जाणार आहे. येत्या काळात परभणीत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“शासन आपल्या दारीमधील योजना या क्रांतीकारी योजना आहेत. अनेक लोक विचारतात शासन आपल्या दारी म्हणजे काय? राज्य सरकारच्या सर्व योजना आणि निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपासून सर्वांनाच फायदा होत आहे. राज्य सरकारलाही या कामच्या माध्यमातून जनता जनार्दनांचे आशिर्वाद मिळत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यचा निधीमध्ये आपण 100 कोटींचा आकडा पार केला”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

पाठण्यातील विरोधकांच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

“आम्ही पाठणपासून योजनांचे लाभ द्यायला सुरूवात केली. पण काही लोक पाठण्यामध्ये जमा झाले होते. तिथे द्वेशाची आणि स्वार्थाची किचडी पकवू लागले. परंतु, या देशाला पुढे न्यायचे असेल, आर्थिक विकास करायचा असेल तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. तसेच, या राज्याच्या विकासाचा काम सुरू आहे. अनेक प्रकल्प, पायाभूत सुविधा, मेट्रो आणि रस्त्यांचे काम सुरू आहे. आज ताकदीचे सरकार ताकदीने काम करत आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असलेली जलयुक्त शिवार योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना सुरू केली. या योजनेच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारची ही जलयुक्त शिवार योजना मागील अडिच महिन्यांच्या काळात बंद करण्यात आली होती. पण आपले महायुतीचे सरकार सत्तेवर येताच पुन्हा ही योजना सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच जपान दौरा पार पडला. या जपान दौऱ्यात झायकाकडून दोन ते तीन प्रकल्पांना जपान सरकारचे सहकार्य मिळवण्यात फडणवीसांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


हेही वाचा – यंदा परभणीत सरासरी पावसाच्या तुलनेत 43 टक्केच पाऊस; अजित पवारांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -