घर महाराष्ट्र विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध : मुख्यमंत्री

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध : मुख्यमंत्री

Subscribe

 

नवी दिल्ली: विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

- Advertisement -

दिल्लीतील प्रगती मैदान येथे नवीन संम्मेलन सभगृहात नीति आयोगाच्या आठव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

या परिषदेत राज्याच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांनी विकसित भारत @2047 संकल्पनेचा स्वप्न साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध असून, आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन केले. शेतकरी, महिला आणि तरूण हे राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचीही ग्वाही दिली.

- Advertisement -

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. त्यांच्या उत्थानासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून, शेतकऱ्यांसाठी या बैठकीत विचार मांडताना शिंदे म्हणाले की, कृषी कल्याण, महिला सक्षमीकरण व युवा कल्याण तसेच सर्व वर्गांच्या कल्याणासाठी राज्य वचनबध्द असून, शेतक-यासांठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला (PMKSNY) पूरक म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अतिरिक्त निधी रु. 6000 प्रति शेतकरी दिला जात आहे.यातून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील तरुणांना 1.5 लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याचे शिंदे यांनी सागितले. युवकांना नियुक्तीचे आदेश देण्यासाठी राज्यात नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात असून, इतर मागासवर्गीयांच्या लाभार्थ्यांसाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरू केली आहे, असे  शिंदे यांनी सांगितले.

4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील सर्वात औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, मुख्यमंत्री यांनी कृषी योजनेतंर्गत CFC साठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

समृद्धि महामार्ग, शक्तीपीठ एक्सप्रेसवे, विरार-अलीबाग मल्टी मॉडल कॉरीडोर आणि देशातील सर्वात लांब रस्ता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आधारे महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार झाला असून यात 2 कोटी 72 लाख कुटुबिंयांना लाभ मिळाला. मोफत तसेच दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

रोजगार क्षमता, अद्योजगता तसेच नवोपक्रमाला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, 10 लाखाहून अधिक उमेदवारांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले असून, 2 लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. नवीन गुंतवणूक, नागरिक आणि पर्यावरण पूरक महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 लवकर तयार होण्याबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 

- Advertisment -