घरमहाराष्ट्रयंदाही कोरोनामुळे दहीहंडीचे थर लागणार नाहीत

यंदाही कोरोनामुळे दहीहंडीचे थर लागणार नाहीत

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण अवघ्य़ा काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा सण म्हणजे दहीदंडी. मात्र यंदाही कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी आयोजित करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या आरोग्यासाठी काही काळ सण-उत्सव बाजुला ठेवुयात अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव साजरा होणार नाही.

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नाही. मात्र यंदा छोट्याप्रमाणात का होईना उत्सावाला परवानगी द्यावी अशी मागणी दहीहंडी पथकांनी केली होती. जागेवरचं मानाची हंडी फोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. याशिवाय सर्व गोविदांना लसीचे दोन डोस पूर्ण करत दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरी करण्याची जबाबदारी आमची असेल अशी मागणी समन्वय समितीने बैठकीत ठेवली.

- Advertisement -

मात्र यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की ‘जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन केले.

दहीहंडीमुळे कोरोनाचा प्रभाव मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गोकुळाष्ठमी हा सण खांद्याला खांदा लावल्याशिवाय होऊ शकत नाही. यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो. असं मत टास्क फोर्सन व्यक्त केल्याचे सरकारने सांगितले. तसेच जागतिक स्तरावरील या उत्सवाची संस्कृती टीकावी यासाठी गणेशोत्सवाच्या धर्तीवर दहीहंडीसाठी एसओपी तयार करण्य़ासंदर्भातील मागणी समितीने केली. मात्र बैठकीत उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी देऊ शकत नाही असे सांगत समितीने सदस्यांना समजवण्याची भूमिका घेतली.

- Advertisement -

या बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या ऑनलाईन बैठकीत उपस्थित होते.

पारंपरिक दहिदंडीला परवानगी द्या – भाजपा आमदार अॅड.आशिष शेलार

काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहिदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पुर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने त्या़ना बैठकीत सहभागी होता आले नाही.


लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -