घरताज्या घडामोडी"बऱ्याच दिवसांनंतर मास्क काढून बोलतोय", मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात काढला मास्क अन्...

“बऱ्याच दिवसांनंतर मास्क काढून बोलतोय”, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात काढला मास्क अन्…

Subscribe

पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली तर अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाषण करताना आपला मास्क काढला आणि भाषण केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मास्क काढल्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाल्या त्या लक्षात येत मुख्यमंत्री म्हणाले बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून बोलतो आहे. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध विकासकामांचे उद्घान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मास्क काढला होता. जाहीर कार्यक्रमात मास्क काढल्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये कुजबुज सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या हे लक्षात आलं आणि आज पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्क काढला, बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षण घेताना मानसिक स्वास्थ्य कायम राखणेदेखील महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पोलीस अकॅडमीच्या निसर्गरम्य परिसरात उत्तम सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात प्रशिक्षण घेऊन बाहेर जाणारे अधिकारी राज्यातील माताभगिनींचे रक्षण करणार आहेत. अकादमीच्या गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने येथील सुविधा व प्रशिक्षणाची माहिती घेण्यासाठी पुन्हा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, माझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलिस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. आपल्या पोलिसांमध्येही क्रीडा राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देणे, सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. क्रीडा स्पर्धेतील यशासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीबाबत पोलिसांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. शिस्तबद्ध संयोजनाने आणि झालेल्या कामाने आपण भरावरून गेलो, कामाच्या कौतुकासाठी शब्द नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

विविध प्रकल्पांचे उद्धाटन

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलिबॉल मैदान तसेच निसर्ग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी इतर मान्यवरांसह या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -