घरट्रेंडिंगNeeraj Chopra Gold Medal Celebration: 'येथे' दिलं जातंय 'नीरज' नावाच्या व्यक्तीला पेट्रोलसह...

Neeraj Chopra Gold Medal Celebration: ‘येथे’ दिलं जातंय ‘नीरज’ नावाच्या व्यक्तीला पेट्रोलसह कटिंग शेव्हिंग फ्री

Subscribe

भारताचा २३ वर्षीय सुवर्णवीर नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. नीरजने आपल्या एका थ्रोने अनेक रेकॉर्डही तोडले आहेत. नीरज नावाच्या लोकांना जुनागढमधील गिरनार रोपवेवर मोफत प्रवास मिळणार आहे, तर भरूचमधील पेट्रोल पंप मालकाने ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. यासह अंकलेश्वरच्या एका प्रसिद्ध सलून मालकाने नीरज नावाच्या लोकांचे मोफत कटिंग, शेव्हिंग करण्याची घोषणा केली आहे. ऑलिम्पिक सामन्यांमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर, जेव्हा भालाफेकात नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले, तेव्हा देशातील प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने उंचालसी. केंद्र आणि राज्य सरकार, क्रीडा संस्था, विविध संघटनांनी नीरज आणि इतर ऑलिम्पिक खेळाडूंसाठी मोठाली बक्षीसं घोषित केलेत, तर नीरज नावाच्या लोकांना जुनागढच्या गिरनार रोपवेवर मोफत प्रवास करण्याची संधी दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते २० ऑगस्ट दरम्यान, नीरज नावाची कोणतीही व्यक्ती आपले ओळखपत्र घेऊन गिरनार रोपवेवर जाऊ शकते, असे जुनागढमधील उषा बेक्रो कंपनीच्या संचालकाने सांगितले. तसेच, या रोपवे वरून प्रवास करताना त्या व्यक्तीकडून कोणतेही शुल्क न घेता हा प्रवास करता येणार आहे. गिरनार रोपवे हा देशातील सर्वात लांब रोपवे आहे. याचे एका बाजूचे तिकीट चारशे रुपये आहे, तर दोन्ही कडील तिकीट सातशे रुपये आहे. पूर्वी गिरनार पर्वतावर जाण्यासाठी नऊ हजार ९९९ पायऱ्या चढाव्या लागतात, त्यामुळे आता अंबा माता जी मंदिर जुनागढ भवनाथाच्या पायथ्यापासून रोप वेने काही मिनिटात पोहोचता येणार आहे.

- Advertisement -

भरूचच्या अंकलेश्वरमधील एका सलून मालकाने नीरज नावाच्या लोकांसाठी मोफत कटिंग आणि शेव्हिंग करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता नीरज नावाच्या लोकांना त्यांच्या सलूनमध्ये शेव्हिंग आणि कटिंग करणाऱ्या लोकांची गर्दी होताना दिसत आहे.


Covid-19 Vaccine: लसीकरणानंतर त्वचेवर येणारे पुरळ,चट्टे चिंता वाढवणारे आहेत? वाचा सविस्तर
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -