घरताज्या घडामोडीराज्यातील नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

राज्यातील नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

Subscribe

राज्यातील काही ठिकाणी कायमस्वरुपी किती पाऊस पडला तरी बाधा येणार नाही असे काम केले पाहिजे - मुख्यमंत्री

नागपुरात कडबी-गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपुजन करण्यात येत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व्हिसीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात संबोधताना राज्यात नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे असल्याचे म्हटलं आहे. तसेच नव्या टेक्नोलॉजीचा उपयोग करुन पर्यावरणाला सांभाळून काम करु जेणेकरुन पिढ्यानपिढ्या ते काम टिकलं पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, सध्या जगभरात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या संकटामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं आहे. सुरुवातच तौत्के चक्रीवादळामुळे झाली त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना पूर, अतिवृष्टी हे संकट समोर आले आहे. विशेष म्हणजे हे आता वारंवार घडायला लागले आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते पूर यातून आपण सावरु नक्की तेवढा महाराष्ट्र समर्थ आहे. परंतू हे करत असताना विकास कामे करतो आहोत यामध्ये नवीन रेल्वेमार्ग, उड्डाणपुल, नवीन रस्ते आहेत याची बांधणी करत असताना पर्यावरणाचा विचार करतो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्यांमधील रस्त्यांच्याबाबतीत मला माहिती दिली होती. राज्यातील रस्ते असे बनले पाहिजेत ज्याच्यावर अनेक वर्षे खड्डा पडता कामा नयेत. आता खड्ड्यांच्या पलिकडे जाऊन रस्तेच्या रस्ते खचत आहेत. ह्या वर्षीचे संकट निभाऊ पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा अजून सुरु असून दोन तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पावसामध्ये रस्ते वाहून गेले, खड्डे पडले, रस्ते खचले आहेत. पूल वाहून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला नव्या टेक्नोलॉजिची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना म्हटलं आहे. पर्यावरणाला सांभाळून काम करु काही ठिकाणी कायमस्वरुपी काम केले पाहिजे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राज्यातील काही ठिकाणी कायमस्वरुपी किती पाऊस पडला तरी बाधा येणार नाही असे काम केले पाहिजे. हा नागभीडचा प्रस्ताव आला होता तेव्हा अशी विनंती केली होती की जिथे जिथे जंगल असेल तिकडे पुणे-मुंबईसारखा उन्नत मार्ग तयार करावा, तसेच प्राणघातक रेल्वे फाटक जिवघेणे ठरु नये यासाठी उड्डाणपुल तयार करण्यात येत आहेत. सृष्टी आणि पर्यावरणाला बाधा येऊ न देता काही मार्ग उन्नत मार्ग करु शकलो तर वनसंपत्ती तशीच राहील आणि वरुन प्रवास करताना जंगल पाहणं सुखद ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा मार्गासाठी खर्च खूप लागेल परंतू सध्या आपत्ती उद्भवल्यावर त्यापेक्षा अधिक खर्च येत आहे त्यामुळे अताच खर्च करुन कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -