Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक तुमचा व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचला आणि कोणी टाळला...कसे शोधाल?

तुमचा व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचला आणि कोणी टाळला…कसे शोधाल?

Related Story

- Advertisement -

व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. सोशल मीडियावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या चॅटिंग ॲपमध्ये व्हॉट्सअॅप हे युजर्सच्या अधिक पसंतीचे आहे. या व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण अनेकांना अद्यापही याचा वापर करने किचकट जाते . अनेक यूजर्संना तर व्हॉट्सॲपवर असे काही पर्याय उपलब्ध आहे हे सुद्धा ठाऊक नसते. तर आज आपण तुम्ही पाठवलेला मॅसेज गृप चॅटमध्ये कोणी वाचला आहे की इग्नोर केला आहे याची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पाठवलेला मॅसेज जर प्रत्येकाने वाचला असेल तर त्या मॅसेज खाली निळ्या रंगाची टिक येते तसेच आता हा कोणत्या मॅसेज गृप मेंबरने वाचला हे देखील एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्हाला कळू शकते.

Android युजर
तुम्ही पाठवलेल्या मॅसेजवर काही सेकंद प्रेस करा आणि होल्ड करुन ठेवा यानंतर त्याच्या भोवती वर्तुळासह “i” पर्याय उपलब्ध होईल त्यापर टच केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा मॅसेज कोणी वाचला आहे. आणि अद्याप इतक्या लोकांनी तुमचा मॅसेज वाचला नाहीये.

- Advertisement -

आयफोन युजर
तर आयफोन युजरसाठी काही वेगळे फीचर्स मोबाईलमध्ये ॲड करण्यात येतात. आय फोन युजरने प्रथम ग्रुप चॅट ओपन करावे यानंतर तुम्ही पाठवलेला मॅसेज उजवीकडून डावीकडे स्वाइप करा. तुम्हाला मॅसेज कोणाकडे गेला आहे आणि कोणी वाचला आहे याची संपुर्ण माहिती मीळू शकते.

व्हॉट्सॲपवर मॅसेजवर काही मार्क देण्यात येतात याचा नेमका अर्थ काय असतो –

- Advertisement -

क्लॉकमार्क: मेसेज सेंड होत आहे
एक ग्रे चेकमार्क: व्हॉट्सअॅपने मेसेज पाठवला आहे. अद्याप समोरील व्यक्तीकडे पोहोचला नाही.
दोन ग्रे चेकमार्क: व्हॉट्सअॅप मेसेज पोहोचला आहे.
दोन ब्लू चेकमार्क: तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला आहे.


हे हि वाचा – Facebook च्या ५० टक्के युजर्सचा सर्वाधिक वेळ जातो व्हिडिओ पाहण्यात, फेसबुक सीईओंची माहिती

- Advertisement -