घरताज्या घडामोडीविरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मनसे' पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मनसे’ पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

Subscribe

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मागच्या दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असला तरी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याआधीच पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यांचे नियोजन केले आहे. मात्र मुख्यमंत्री ऑनलाईन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावरुन त्यांच्यावर टीका देखील झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोमवार (दि. १९) पासून सोलापूर दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दोनच दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करावी, असे आवाहन केले होते. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल Online बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”, अशी साद बाळा नांदगावकर यांनी घातली होती. त्यानंतर ठाकरे यांनी दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय ‘मनसे’ आहे का? अशी शंका घ्यायला जागा आहे.

- Advertisement -

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी,
सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहराकडे प्रयाण,
सकाळी 11:30 वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी,
सकाळी 11:45 वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,

दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,

दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,

दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -