घरताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींच्या घोषणेचे स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आज संबोधित केलं. मोदींच्या या छोट्याशा संबोधनात तीन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहून लसीकरण निर्मीतीसाठी भारताने काम करण्यास सुरूवात केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात भारतात सुरूवात करण्यात येणार आहे. नवीन वर्षातील २०२२ मध्ये ३ जानेवारीपासून लहान मुलांना लस देण्यास सुरूवात केली जाणार आहे. कोरोना विरूद्ध लढण्य़ासाठी भारत अधिक सक्षम होईल. त्याचप्रमाणे शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी मिटेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -