घरमहाराष्ट्रटोलवसुलीच्या चौकशीसाठी सीबीआयला पत्र

टोलवसुलीच्या चौकशीसाठी सीबीआयला पत्र

Subscribe

पुणे-सातारा मार्गावरील टोलप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उचलले पाऊल

पुणे-सातारा मार्गावरील रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडून जी टोलवसुली केली जात आहे, ती बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करून असल्याची तक्रार, आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केली होती. त्या आधारावर आता सीबीआयने राज्य सरकारला पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, असे म्हणत पत्र पाठवले आहे.

१ जानेवारी २०१६ पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर पुणे-सातारा मार्गावर जी टोलवसुली करत आहे ती बेकायदेशीर आणि नियमांचे उल्लंघन करून आहे. सीबीआयने त्यावर प्राथमिक चौकशी केली. नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -