घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतृतीयपंथीयांकडून करायचे हप्तेवसुली; दोन गुंडांना सिनेस्टाईल अटक, दरआठवड्याला व्हायची २ लाखांची वसूली

तृतीयपंथीयांकडून करायचे हप्तेवसुली; दोन गुंडांना सिनेस्टाईल अटक, दरआठवड्याला व्हायची २ लाखांची वसूली

Subscribe

नाशिक : रेल्वेच्या मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्‍या तृतीयपंथीयांकडून शस्त्राचा धाक दाखवून हप्ता वसुली करणार्‍या दोन गुंडांना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व पोलीस पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून रंगेहात पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील एक संशयित गुंड फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सूरज गोपीचंद भंडारी, गोपीचंद काशिनाथ भंडारी (दोघेही रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २५) इगतपुरी बसस्थानकाजवळील दर्गा परिसरात रेल्वे प्रवासी गाड्यांध्ये भिक्षा मागणारे तृतीयपंथी बसलेले होते. या ठिकाणी तीन युवक कोयता व धारदार शस्त्र घेवून आले व प्रत्येक तृतीयपंथीयांकडून शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देत हफ्ते वसुली करत होते. आज धंदा झाला नाही, ऊद्या देतो, अशी तृतीयपंथीयांनी सांगितले. मात्र, तिघांनी शस्त्राचा धाक दाखवल्याने हे तृतीयपंथी भयभीत झाले. ही बाब गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या लक्षात आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच शस्त्रधारी युवकांची पळ काढला. मात्र, पोलीस पथक व पोलीस निरीक्षक यांनी सिनेस्टाईलने पाठलाग करीत दोन युवकांना ताब्यात घेतले. यावेळी घटनेतील तृतीयपंथीयांची विचारपूस केली असता हप्ते वसुलीचा प्रकार समोर आला.

- Advertisement -

सुगंधा परशुराम गायकवाड ( वय ३८, रा. पत्रीपुल झोपडपट्टी, कल्याण पुर्व, जि. ठाणे) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तीन युवकांविरुद्ध जीवे मारण्याची धमकी व हप्ता वसुलीबाबत फिर्याद दिली. इगतपुरी शहरात काही महिन्यांपुर्वी शहरात डेव्हिड गँग व भंडारी यांच्या हप्ता वसुलीच्या वादावरून दोन्ही गँगमधील दोन जणांचा खून झाला होता. या घटनेवरून मागील काही गुन्ह्यांची कबुली देत दोन संशयितांनी सर्व माहिती पोलीसांना देताच तपास चक्राला गती आल्याने शहर व नांदगाव सदो येथील मोठी हप्ता वसुली टोळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शहरातील व्यापारी व व्यवसायिकांना गुंड पुरवून धाक दाखवून हाणामारी, लूटमार व हप्ता वसुली करून सर्वसामान्य जनतेला व महिला, मुलींना त्रास देत या गँगने जेरीस केले होते. मात्र, पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी खाकीचा धाक निर्माण केला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले झाल्याची प्रतिक्रीया नागरीकांनी दिल्या.

शस्त्र बाळगणारे व गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालकांनी नागरिकांसह महिला, मुली व जेष्ठ नागरीकांना त्रास दिला तर इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सोपान राखोंडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पी. एस. खिल्लारी, गोपनीय पोलीस निलेश देवराज पोलीस हवालदार मुकेश महिरे, सचिन देसले, सचिन मुकणे, अभिजित पोटींदे, शरद साळवे, राहुल साळवे आदी करीत आहेत.

- Advertisement -
दरआठवड्याला २ लाखांचा हप्ता

कल्याण ते इगतपुरी रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी, पाणी बॉटल व खाद्य पदार्थ विक्री करणारे सुमारे ४०० हॉकर २४ तास धंदा करतात. प्रत्येकांकडून ५०० रूपये हप्ता आठ दिवसाला जमा केला जातो. ही रक्कम लाखो रूपयात जमा होते. त्याचे वाटप प्रत्येक गुंड आपल्या धाक व दरार्‍या प्रमाणे ठरवतो. या कारणामुळे आपसात भांडण होवुन प्रकरण खूनापर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे गुंडांच्या दहशतीचा बिमोड केला जात आहे, असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -