Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींच्या खासदारकीवरुन काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध

राहुल गांधींच्या खासदारकीवरुन काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध

Subscribe

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेते संसदभवनात काळे कपडे परिधान करुन पोहोचले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होताच काॅंग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

काॅंग्रेस नेता आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारला या मुद्यावरुन चांगलेच धारेवर पकडले आहे. यातच आता सोमवारी काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेते संसदभवनात काळे कपडे परिधान करुन पोहोचले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होताच काॅंग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

काँग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावली

काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक पार पडली. काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आययूएमएल, एमडीएमके, केसी, टीएमसी, आरएसपी, आप, जम्मू काश्मीर एनसी, उद्धव गट या पक्षांचे खासदार यात सहभागी झाले होते. संसदेतील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या चेंबरमध्ये ही बैठक झाली. या सभेला बहुतांश नेते काळे कपडे परिधान करून आले होते.

- Advertisement -

काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, आज ही गोष्ट सर्वत्र पोहोचली आहे की, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले आहे जेणेकरून ते त्यांचे जवळचे मित्र अदानी यांना वाचवू शकतील. आमच्या पक्षाचे लोक आंदोलन करत आहेत, राहुल गांधींवर आरोप झाले, पण त्यांना एकदाही (सभागृहात) बोलू दिले गेले नाही.

काँग्रेसचे खासदार रणजित रंजन म्हणाले, लोकशाहीचा आवाज बंद करण्यासाठी हे षड्यंत्र सुरू आहे. तुम्ही लोकसभेतून विरोधकांचा आवाज बंद करत आहात. विरोधी पक्ष घोटाळ्यांवर बोलणार नाही तर कशावर बोलणार? आम्ही काय सत्ताधा-यांच्या बोलण्यावर सहमत व्हायचे का? तुम्हाला  राजेशाही हवी आहे. आज तुम्ही  घाबरला आहात.

- Advertisement -

( हेही वाचा: हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप )

पंतप्रधान मोदींची मंत्र्यांसोबत बैठक

संसदेच्या रणनीतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा,  अध्यक्ष जेपी नड्डा, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामण, अनुराग ठाकूर यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.

- Advertisment -