घरमहाराष्ट्रकाँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार अन् भाजप सत्तेत येणार - रामदास आठवले

काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार अन् भाजप सत्तेत येणार – रामदास आठवले

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष काँग्रेस नाराज असून लवकरच सत्तेतून बाहेर पडणार आहे. त्यानंतर हे सरकार कोसळून महाराष्ट्रात भाजप सत्तेत येईल, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार किती दिवस सत्तेत राहील याबाबत आपल्या मनात शंका असल्याचंही आठवले यांनी सांगितलं. रामदास आठवले सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला. आठवले गेले दोन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला तेवढा सन्मान मिळत नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज आहे. याच कारणामुळे काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहणार आहे, हे सांगता येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजून किती दिवस सत्तेत राहील याबाबत शंका आहे, असं रामदास आठवले म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी या दोन पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे मतभिन्नता असलेल्या पक्षांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे, असं कळतंय, असं आठवले म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपला सत्तेत येण्यासाठी फक्त २८ आमदारांची गरज आहे. निवडणूक टाळण्यासाठी अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपचं सरकार स्थापन होईल, असं रामदास आठवले म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -