घरमहाराष्ट्रशाळांना भिकारी म्हणणाऱ्या जावडेकरांनी माफी मागावी - अशोक चव्हाण

शाळांना भिकारी म्हणणाऱ्या जावडेकरांनी माफी मागावी – अशोक चव्हाण

Subscribe

'शाळा आणि शिक्षकांना भिकारी म्हणणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून त्यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी', अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण शनिवारी नाशिकला आले होते.

‘शाळा आणि शिक्षकांना भिकारी म्हणणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून त्यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण शनिवारी नाशिकला आले होते. ‘अस्तित्वात नसलेल्या जिओ इन्स्टिट्युटला हजारो कोटींची खैरात वाटणारे प्रकाश जावडेकर शाळांना आणि शिक्षकांना भिकारी म्हणत आहेत. शाळांना निधी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारकडून दिला जाणारा निधी हा देशातील जनतेने कररुपाने दिलेला पैसा आहे. जावडेकर यांच्या मालकीचा नाही. त्यामुळे जावडेकरांनी सरकारी निधीला स्वतःची मालमत्ता समजू नये. जावडेकर यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या पदाला शोभणारे नसून, त्यांनी तात्काळ माफी मागावी’, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

जावडेकरांनी शाळांना दिला होता सल्ला

शाळांनी राज्य सरकारकडे भीक मागू नये, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठा वाद सुरू केला होता. ‘शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे मदतीसाठी आर्थिक सहाय्य मागावे. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचं कामच आहे’, अशा प्रकारचं वक्तव्य जावडेकरांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केलं होतं.


हेही वाचा – राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत – अशोक चव्हाण

- Advertisement -

दानवेंवर देखील चव्हाण भडकले

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी यावेळी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. रावसाहेब दानवेंना अर्थकारण समजत नाही. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कशा ठरतात ते माहीत नाही. त्यामुळेच दानवे इंधनाच्या दराबाबत चुकीची वक्तव्ये करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती युपीए सरकारच्या काळापेक्षाही कमी आहेत, तरीही देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती युपीएच्या काळापेक्षा जास्त आहेत. याचे कारण सरकारने इंधनावर लावलेले अन्याय्य कर आणि अधिभार आहेत. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणून सरकारने जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी करून इंधनाच्या किंमती आणि राफेल विमान खरेदी घोटाळा या गोष्टी रावसाहेब दानवेंच्या समजण्यापलीकडच्या आहेत. त्यांनी यासंदर्भात बोलू नये. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावे, असा टोला अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -