घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिल्लीत सेना-भाजप युतीवर एकमत, तर नाशिक मध्ये रंगले वाकयुद्ध; नाशिक लोकसभेच्या जागेवरून...

दिल्लीत सेना-भाजप युतीवर एकमत, तर नाशिक मध्ये रंगले वाकयुद्ध; नाशिक लोकसभेच्या जागेवरून वादाची ठिणगी

Subscribe

भाजप नेत्याचे शिंदे गटाच्या खासदारावर टिकास्त्र

नाशिक : रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत. गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे. हालअपेष्ठा सहन करत, नागरिक सारे वैतागले आहेत. काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा, गाव सारं पाहतं आहे. कारभारी बदलण्यासाठी, रान सारं पेटले आहे अशा शब्दांत भाजपच्या एका नेत्याने शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिकास्त्र सोडले आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आले असून यामुळे भाजप शिंदे गटांत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. शिंदे गटाच्या आमदार खासदार गद्दारी करुन भाजपसोबत गेल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र भाजप खंबीरपणे शिंदे गटाच्या पाठिशी असल्याचे नेहमीच दिसले. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. या दौरयानंतर आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये या दोेन्ही गटात नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.

- Advertisement -

भाजपकडून महापालिकेचे माजी सभागृह नेता दिनकर पाटील इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. खासदार गोडसे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकची जागा शिंदे गटाकडे आहे. अद्याप भाजप शिंदे गटात जागा वाटपाचे सुत्र ठरलेले नाही. नाशिकच्या जागेसाठी भाजपाही आग्रही आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून गोडसे हे दुसर्‍यांदा निवडून आल्याने या मतदारसंघावर त्यांची दावेदारी आहे. मात्र जागा वाटपापूर्वीच नाशिकच्या जागेवरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. याच वादातून म्हणा किंवा स्पर्धेतून भाजपच्या इच्छुक उमेदवार दिनकर आण्णा पाटील यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर टीका केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेना खासदारांवर टीका करण्यात आली आहे. रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत. गद्दार ते गद्दारच शेवटी, आता सार्‍यांना पटले आहे. हालअपेष्ठा सहन करत, नागरिक सारे वैतागले आहेत. काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा, गाव सारं पाहतं आहे. कारभारी बदलण्यासाठी, रान सारं पेटलं आहे. धडाडी आणि सचोटीचे आण्णा, पुढारी नाही, आधार उद्याचा, खासदार आता नाशिकचा, सार्‍यांचं ठरलं आहे! अशा शब्दांत विद्यमान खासदारांवर टिका करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मला माहीत नाही : दिनकर पाटील 

मला याबाबत काही माहित नाही. माझा या पोस्टशी काही संबंध नाही. पक्षाचे नेते रवी अनासपुरे यांनी मला काम सुरू करायला सांगितले आहे. निवडणुकीसाठी पक्षाची नेहमी तयारी असते. पक्ष निर्णय घेईल मी काम करतोय. माझ्या पोस्टशी काहीही संबंध नाही त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही.

इच्छुकांना माझ्या शुभेच्छा : खासदार हेमंत गोडसे 

प्रत्येकालाच निवडणूक लढण्याची इच्छा असते. सर्व इच्छुकांना माझया शुभेच्छा. जागा वाटपाचा निर्णय हा वरीष्ठ पातळीवर होत असतो. अजून निवडणुकांना बराच अवधी आहे. पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. त्यामुळे अनेक घडामोडी घडू शकतात. कोणत्या जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अद्याप ठरलेले नाही त्यामुळे आता बोलणे उचित नाही.

आम्ही बोललो तर ठीक, पण भाजप.. : छगन भुजबळ 

विरोधीपक्षाने असे म्हटलं तर एकवेळ ठिक आहे परंतू भाजपच्या नेत्यांनी असे म्हणणे चुकीचे आहे. निदान त्यांनी तरी असे म्हणून नये. खासदारांना असे म्हणणे म्हणजे थेट मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप करण्यासारखे आहे त्यांनाही ते लागू पडते. निदान किमान भाजपच्या लोकांनी तरी असे बोलू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -