घरCORONA UPDATECoronaVirus : कोरोनातही बेस्टच आरोग्य विभाग सर्वाधिक बेस्ट!

CoronaVirus : कोरोनातही बेस्टच आरोग्य विभाग सर्वाधिक बेस्ट!

Subscribe

४०० बेस्ट कर्मचाऱ्यांना मधुमेह , हृदयविकार, अस्थमा, कॅन्सर असे रोग त्यावर बेस्ट आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

संपूर्ण विश्वात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणू दहशत मुंबईतही निर्माण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आता दिवसेंदिवस कोरोना विषाणूची केंद्र बनत चालली आहे. मात्र, या मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी कोरोनाच्या रेड झोनमध्ये जाऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बेस्टच्या आरोग्य विभागाने कंबर कसली होती. त्यामुळे गेल्या एका महिन्यात फक्त चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्यातील ३ कर्तव्यांवर नव्हते. तसेच विविध कारणामुळे १७० बेस्ट कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन केले होते. त्यातील १०० कर्मचारी कामावर परत आले आहे. तर ४०० बेस्ट कर्मचाऱ्यांना मधुमेह , हृदयविकार, अस्थमा, कॅन्सर असे रोग त्यावर बेस्ट आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. त्यामुळे बेस्टच आरोग्य विभाग कोरोना विरोधात पुन्हा बेस्ट ठरलं आहे.

कोरोनाच्या या जागतिक संकटाविरोधात लढण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहेत. या लॉकडाऊन काळात मुंबईची लोकलसह सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद आहेत. अशा परिस्थिती अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याकरिता बेस्ट उपक्रमाच्या बसेस  रस्तवार धावत आहेत. तसेच ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्या त्या परिसराला प्रशासन सील करण्यात आले आहे. मात्र या कोरोनाच्या रेड लाईट परिसरात सुद्धा बेस्टचे बसेस आणि बेस्टच्या विद्युत विभागाचे कर्मचारी सतत सेवा देत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी बेस्ट प्रशासनाची आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून बेस्टच्या आरोग्य विभागाने कोरोनापासून बेस्टच्या कर्मचाऱ्याचे संरक्षण आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास कसा द्यायचा यावर अनेक उपायोजना बेस्टच्या केल्या आहेत. यांची सुरुवात बेस्टकडून सहा मार्चपासून केली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषयी जनजागृतीची करण्याकरिता बेस्टचे  कार्यालय, बस स्टॉप आणि आगारातमध्ये पोस्ट लावून यासंबंधित जनजागृती केली होती. तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडून कोरोना संबंधित मार्गदर्शन केले होते. 


ही आहे ती औषधे 


बेस्टचे 
कार्यालय, आगार, बसेस आणि  विद्यतूत विभागाचे वाहने दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी विशिष्ट प्रकारचे औषधांचा वापर करण्यात येत आहे. हाफकिनकडून मान्यता मिळलेल्या अमोनियम कंपाऊंड या औषधीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या औषधाची फवारणी केल्यानंतर २४ ते ७२ तास प्रभाव असतो. त्यामुळे जर बसेसमध्ये कोणीही शिकलं किंवा खोकलून त्यांची थुक बसमध्ये पडली. त्यामुळे विषाणू नष्ट होते. त्यामुळे यांच्या फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांनी दिली. 

१७० कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन 

लॉकडाऊन काळात बेस्टच्या कर्मचारी कर्तव्यावर होते. तेव्हा बसेसमध्ये कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांना सर्दी किंवा खोकला लक्षणे दिसली. किंवा बेस्टमध्ये या लक्षणांचे प्रवासी प्रवास करत असल्याचं लक्षात आले. तर तात्काळ बेस्टच्या त्या बसेसचे कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यत १७० कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन केले असून त्यातील १०० कर्मचारी १४ दिवसाचा कालावधी पूर्ण करून कामावर परतले आहे, अशी माहिती बेस्टच्या आरोग्य विभागाने दिली आहेत. 
 

४०० कर्मचाऱ्यांवर बेस्टच लक्ष  

ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, अस्थमा, कॅन्सर असे रोग आहे. त्यांना कोरोनाची सगळ्यात जास्त भीती असते, अशा कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करून बेस्टच्या आरोग्य विभागाने त्यांना घरी थाबून आराम करण्याची सल्ला दिला आहेत. ज्यांना कामावर येत आहे. त्यांना कार्यलातच काम देण्यात येत आहेत. असे रोग असणारे ४०० कर्मचारी बेस्टमध्ये आहेत. ज्यांना इन हाऊस काम दिले आहे.
 
कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी 
सध्या लॉकडाऊनच्या काळ वाढला आहे. अनेक बेस्टचे कर्मचारी आता कामावर रुजू होत आहे. मात्र, कामावर रुजू होण्याअगोदर बेस्टचा आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांची पूर्णपणे विचार पूस करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा बेस्टकडून करण्यात येत आहे. सध्या बेस्टच्या आरोग्य विभागात १५० कर्मचारी कार्यरत आहेत.
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -