घरताज्या घडामोडीराज्यातील 'ही' मोठी मंदिरे राहणार बंद!

राज्यातील ‘ही’ मोठी मंदिरे राहणार बंद!

Subscribe

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यातील महत्त्वाची मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यातील महत्त्वाची मंदिर बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठी मंदिरे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे खबरदारीसाठी अनेक अनेक मंदिरे बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचे साई मंदिर यांसह राज्यातील सर्व मोठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

तुळजाभवानी मंदिर बंद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर आजपासून बंद राहणार आहे. आज पहाटे ५ वाजता विधिवत पूजा करुन भाविकांसाठी दर्शनासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिर्डीचे साई मंदिर बंद

करोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे. इतिहासात प्रथमत:च मंदिर अनिश्चित काळासाठी बंद राहणार असून पुढील आदेश येईपर्यंत मंदीर, प्रसादालय आणि भक्तनिवास देखील बंद राहणार आहेत.

राज्यातील ही मंदिरे बंद राहणार?

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, गणपती मंदिर – गणपतीपुळे, अंबाबाई मंदिर – कोल्हापूर, तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर, गजानन महाराज मंदिर – शेगाव, खंडोबा मंदिर – जेजुरी, मुंबादेवी मंदिर – मुंबई, एकविरा देवी – कार्ला, महालक्ष्मी मंदिर – सारसबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर – पुणे, प्रभू वैद्यनाथा मंदिर – परळी, बीड कसबा गणपती – पुणे, दत्त मंदिर – श्री क्षेत्र नृसिंहवाडी

- Advertisement -

हेही वाचा – करोनाच्या धास्तीने सरकारी कार्यालये देखील काही दिवस बंद राहणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -