घरCORONA UPDATECoronavirus : ५० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही, अमेरिकी तज्ज्ञांचा दावा

Coronavirus : ५० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही, अमेरिकी तज्ज्ञांचा दावा

Subscribe

५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही. अमेरिकेचे तज्ज्ञ डॉ. अँथनी एस. फॉसी यांनी माध्यमासमोर हा दावा केला.

५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही. अमेरिकेचे तज्ज्ञ डॉ. अँथनी एस. फॉसी यांनी माध्यमासमोर हा दावा केला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कोरोना विषाणू टास्क फोर्सचे सदस्य ही उपस्थित होते.
या नव्या अनुमानावर शास्त्रज्ञ काम करत असल्याचे अँथनी यांनी सांगितले. लक्षणे न दिसणे मोठे आव्हान आहे. अचूक निदानासाठी आम्हाला जास्तीत जास्त तपासण्या कराव्या लागतील. डॉ. फॉसी ऍलर्जी व संसर्गजन्य रोगांच्या राष्ट्रीय संस्थेचे संचालक आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेची मुख्य आरोग्य संस्था सीडीसीचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनीही सांगितले होते की, २५ टक्के रोगांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. त्यानंतर सीडीसीने दिशानिर्देश देत सर्व लोकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला होता.

चीनमध्ये आढळले रुग्ण

चीनमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, चीनमध्ये ७८ अशी प्रकरणे आली. ज्यात कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. यामध्ये ४० रुग्ण परदेशातून संसर्ग घेऊन आले होते. चीनमध्ये सहा दिवसात अशी १३० प्रकरणे समोर आली, ज्यात कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -