घरमहाराष्ट्रकोल्हापूर, सांगली, बारामती जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

कोल्हापूर, सांगली, बारामती जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता लक्षात घेऊन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपआपल्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सांगली, बारामती आणि सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली.

कोल्हापूरमध्ये ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, अशा सूचना सतेज पाटील यांच्याकडून देण्यात आल्या. तशाच सूचना जयंत पाटील यांच्याकडूनही देण्यात आल्या.

- Advertisement -

गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्हिटीचा दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्ह्यातून पुरवला जात आहे, असे म्हणत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील भीषण वास्तवाबाबत माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -