घरदेश-विदेशघरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा

Subscribe

देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा, असे आदेश देतानाच अनेक राज्यांकडून व्हेंटिलेटरचा वापर केला जात नसल्याबद्दल मोदींनी नाराजीही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अधिकार्‍यांनी मोदींना कोरोना परिस्थितीची माहिती दिली. देशात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला सुमारे 50 लाख चाचण्या करण्यात येत होत्या. आता जवळपास 1.3 कोटी चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी मोदींना दिली.

तसेच पॉझिटिव्हिटी रेट घटत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी जिल्हास्तरापासून कोरोनाची स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आणि लसीकरणाची माहितीही देण्यात आली. आरटी पीसीआर आणि रॅपिड टेस्टची संख्या वाढली तरच खरी परिस्थिती समोर येईल. कोणत्याही दबावाशिवाय राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या दाखवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायला पाहिजे. याशिवाय ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवायला हवी. आवश्यकता भासल्यास अंगणवाडी सेवकांनाही सोबत घेण्यास त्यांनी सांगितले. ग्रामस्थांना गृहविलगीकरणाचे नियम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगा, अशा सूचनाही मोदींनी केल्या.

- Advertisement -

व्हेंटिलेटरचं ऑडिट करा
काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग योग्य प्रकारे होत नसल्याच्या रिपोर्टची मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करा. यशिवाय आरोग्य कर्मचार्‍यांना व्हेंटिलेटर चालवण्याचे प्रशिक्षण द्या, अशी सूचना मोदींनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -